Share Market Fraud: गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सव्वा आठ कोटींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

share market fraud
Share Market Fraud: गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सव्वा आठ कोटींची फसवणूक

गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने सव्वा आठ कोटींची फसवणूक

पिंपरी : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची सव्वा आठ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपळे सौदागर येथे उघडकीस आला. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. (Share Market Fraud In Pimpri)

महेश मुरलीधर शिंदे (रा. सेक्टर क्रमांक एक , इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार इन्फीनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडिंग ब्रोकर कंपनीचे संचालक जय मावजी, निजय मेहता, निकुंश शहा व नीलेश शांताराम वाणी या चार आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी इन्फीनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडिंग ब्रोकर कंपनीत गुंतवणूक केलेल्या रकमेवर आरोपींनी फिर्यादी यांना दरमहा फायदा करून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेवर त्यांना दरमहा कोणतीही रक्कम दिली नाही. तसेच कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर या ऍपवर बनावट व खोटा इलेक्ट्रिक अभिलेख तयार करून फिर्यादीची व इतरांची एकूण आठ कोटी २९ लाख ७५ हजार ८०३ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपळे सौदागर येथील एका मॉलजवळील रेनबा प्लाझा येथील ऑफिसमध्ये गेल्यावर्षी १ सप्टेंबर २०२१ ते आतापर्यंत घडला. दरम्यान, फिर्यादी यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असता न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pimpri Share Market Fraud Looted 8 Crore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pimpricrime