esakal | Pimpri अन ज्येष्ठ नागरिकाची होणारी फसवणूक टळली | Pimpri
sakal

बोलून बातमी शोधा

cyber crime

Pimpri : अन ज्येष्ठ नागरिकाची होणारी फसवणूक टळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : निगडी प्राधिकरणातील दत्ता धामणस्कर यांच्या मोबाईलवर संदेश धडकला की, तुम्ही आरोग्य विमा काढला आहे. तुमच्या बॅंक खात्यातून ३० हजार रुपये मिळाले आहेत. परंतु, असा कोणत्याही प्रकारचा विमा काढला नसल्याचे ७२ वर्षाचे धामणस्कर यांच्या लक्षात आले. तत्काळ त्यांनी बॅंकेत संपर्क साधला. फेक कॉलला कोणताही प्रतिसाद केला नाही. कोणत्याही फेक लिंकवर क्लिक केले नाही. बचत खाते बंद करून तत्परता दाखविल्याने होणारा बॅंक सायबर धोका टळला.

निगडीतील शामराव विठ्ठल बँकेत धामणस्कर यांचे बॅंक खाते कित्येक वर्षापासून आहे. ३० सप्टेंबरला रात्री अकरा वाजता दिल्लीतील केअर इन्शुरन्स कंपनीकडून एकतीस हजार रुपये मिळाल्याचा संदेश त्यांना आला. तसेच ९१५२० ने सुरु होणाऱ्या मोबाईल क्रमांकावरुनही सतत त्यांना कॉल येत होते. पवन कुमार या नावाने बनावट मेल आला होता. कोणत्याही अनोळखी मेल व व्यक्तीला उत्तर दिले नाही. त्यांच्या सतर्कतेमुळे होणारा धोका टळला.

नुकतेच त्यांनी बचत खात्यावर जास्त पैसे टाकले होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर या घटनेने त्यांचा रक्तदाब वाढला. बँकेचे व्यवस्थापक भूषण जोशी यांनी ताबडतोब फोन केल्यानंतर सहकार्य दार्शविले. त्यांच्या सूचनेप्रमाणे बँक खाते शिल्लक त्यांनी तपासली. सतत येणारा फोन नंबर ब्लॉक केला. ई-मेल घेणे बंद केले. दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता बँकेत जाऊन कोणालाही पैसे देण्यात येवू नये याबद्दल पत्र दिले. बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना धीर दिला.

माझे पैसे बँकेच्या सतर्कतेमुळे वाचले. एका सामान्य ग्राहकाला बॅंकेनी सहकार्य केले. अशा प्रकारे सर्व बॅंकानी ग्राहकांना सहकार्य करणे अपेक्षित आहे. खासकरून ज्येष्ठ नागरिकांना विमा, एलआयसी आणि पीएफच्या नावाखाली विविध अमिष दाखवून फसवले जात आहे. यासाठी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. कोणालाही ओटीपी व एटीएम पासवर्ड शेअर करु नये. फेक कॉलला उत्तर देवू नये.

दत्ता धामणस्कर, बॅंक खातेधारक, निगडी प्राधिकरण

loading image
go to top