esakal | पिंपरी: आरटीईच्या हजारो जागा रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Admissions

पिंपरी: आरटीईच्या हजारो जागा रिक्त

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी: शहरात आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज केलेल्या १३८ पालकांचे अर्ज कागदपत्रांची पूर्तता आणि इतर कारणांसाठी रद्द करण्यात आले आहेत. तसेच कोट्यातील प्रवेशाच्या ९९४ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश रद्द झालेल्या पालकांची सुनावणी व कागदपत्रांतील त्रुटींची आणि चुकांची दुरुस्ती हा परिणाम असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा: फ्लॅट एक; अडचणी अनेक

शहरात २५ टक्के कोट्यातील ३ हजार ४६४ जागा आहेत. या जागांपैकी २ हजार ४७० जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. शाळा सुरु होऊन तीन महिन्यानंतरही अद्याप आरटीईच्या ९९४ जागा शिल्लक आहेत. यामध्ये प्रवेश रद्द झालेल्यांची सुनावणी सुरु असल्यामुळे अद्याप प्राधान्यक्रम फेरी सुरु करण्यात आलेली नाही.

त्यामुळे ज्या पाल्यांचे प्रवेश झालेले नाहीत त्यांना प्राधान्यक्रम फेरीची प्रतीक्षा आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश अर्ज केलेल्या १३८ पालकांचे अर्ज कागदपत्रांची पूर्तता आणि इतर कारणांसाठी रद्द करण्यात आले आहेत. या पालकांची सध्या सुनावणी सुरु आहे.

यातील कागदपत्रांतील त्रुटींची आणि चुकांची दुरुस्ती झाल्यानंतर विद्यार्थ्यांस प्रवेशास पात्र ठरविले जाणार आहे. तसे नसल्यास प्रवेश रद्द करण्यात येणार असल्याने जोपर्यंत प्रवेश रद्द केलेल्यांची सुनावणी झाल्यानंतर प्राधान्यक्रम फेरी सुरु करण्यात येणार आहे. शाळांच्या मनमानी कारभारामुळे बरेचसे विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित असल्यामुळे पहिल्या फेरीत मुदतवाढ देऊनही कमी विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.

तसेच यंदा काही शाळा बंद व स्थलांतरित झाल्यामुळेही आरटीई प्रवेशावर परिणाम झालेला आहे. कागदपत्रांची काही अडचणी, धावपळ लक्षात घेऊन ही मुदत वाढ देण्यात आली होती. तरीदेखील प्रवेशासाठी काही शाळा जाणिवपूर्वक कारणे देत पालकांची अडवणूक करीत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

‘‘पुणे जिल्ह्यातील शाळा आरटीईबाबत गंभीर नाहीत. सध्या सप्टेंबर महिना सुरु झाला आहे तरी अद्याप सुनावणी सुरु आहे. शासनाने लवकर प्राधान्यक्रम फेरी सुरु करावी.’’ -हेमंत मोरे -अध्यक्ष, आरटीई पालक संघ

एकूण जागा - प्रवेश शिल्लक- रिक्त जागा -प्रवेश रद्द- संपर्क न झालेले -

३४६४ - २४७०- ९९४- १३८- ६५६

loading image
go to top