Metro : पिंपरी-निगडी मेट्रोला अखेर मान्यता; केंद्र सरकारचा निर्णय

दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडकरांना केंद्र सरकारकडून गोड बातमी मिळाली आहे. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचे ‘सीमोल्लांगन’ होऊन पिंपरीपासून निगडीपर्यंत विस्तार होणार आहे.
Pimpri to nigdi Metro
Pimpri to nigdi Metrosakal

पिंपरी - दसऱ्याच्या मुहूर्तावर पिंपरी-चिंचवडकरांना केंद्र सरकारकडून गोड बातमी मिळाली आहे. स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गाचे ‘सीमोल्लांगन’ होऊन पिंपरीपासून निगडीपर्यंत विस्तार होणार आहे. त्यासाठीच्या खर्चाचे गणित मांडत केंद्र, राज्य व महापालिकेचा वाटा किती आणि कर्ज अथवा निधी किती उभारावा लागेल, याचाही अंदाज दिला आहे. यामुळे मेट्रो मार्ग विस्ताराची शहरातील नागरिकांची मागणी पूर्ण झाली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात पुणे मेट्रोचे दोन मार्ग मंजूर आहेत. त्यातील स्वारगेट ते पिंपरी या मार्गाचा मुळा नदीवरील दापोडीतील हॅरिस ब्रिजपासून पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) भवनापर्यंत समावेश होतो. हाच मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी नागरिकांची मागणी होती.

त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित होता. त्याला अर्थात पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्तारीकरणाच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने सोमवारी (ता. २३) मान्यता दिली.

केंद्रीय उपसचिवांचे पत्र

पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी मार्गाचे निगडीपर्यंत विस्तारीकरणाच्या मान्यतेबाबतचे केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाचे उपसचिव सुनील कुमार यांनी राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. त्यात पिंपरी ते निगडी या ४.४१३ किलोमीटर अंतर विस्ताराला मान्यता दिल्याचे म्हटले आहे.

शहरातील मेट्रोचे टप्पे

पहिला टप्पा

फुगेवाडी ते पिंपरी या मार्गावर सहा मार्च २०२२ रोजी प्रवासी वाहतूक सुरू झाली. त्याचे उद्‍घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातून ऑनलाइन पद्धतीने झाले होते.

दुसरा टप्पा

फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट स्थानक पुणे या मार्गाचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक ऑगस्ट २०२३ रोजी झाले. त्यामुळे पिंपरी ते पुणे सिव्हिल कोर्ट तेथून कोथरूड वनाज आणि पुणे स्टेशन, रूबी हॉलपर्यंत जाणे सोयीचे झाले.

तिसरा टप्पा

पिंपरी (पीसीएमसी) ते निगडी मार्गाला २३ ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मान्यता दिली. पिंपरी स्थानकाजवळील एम्पायर इस्टेट पुलापर्यंत मार्गाचे काम झाले आहे. सध्या तिथे मेट्रो यार्ड आहे. तेथून पुढे मार्ग विस्तारीकरणाचे नियोजन आहे.

अशी असतील स्थानके

  • चिंचवड स्टेशन (महावीर व अहिंसा चौक दरम्यान)

  • आकुर्डीतील खंडोबा माळ चौक

  • निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक दरम्यान)

सध्याची स्थानके

  • पीसीएमसी (पिंपरी-चिंचवड महापालिका भवन)

  • संत तुकारामनगर (वल्लभनगर)

  • भोसरी (नाशिक फाटा)

  • कासारवाडी

  • फुगेवाडी

  • दापोडी

पिंपरी-निगडी मेट्रो मार्गाचे काम तीन वर्षे तीन महिन्यांत पूर्ण होईल. त्यासाठी जनरल कन्सल्टन्सी नेमण्यासाठी व या प्रकल्पाचा सोशल इम्पॅक्ट असेसमेंट बनविण्यासाठी निविदा काढल्या आहेत. लवकरच सिव्हिल, विद्युत आणि सिग्नल कामाच्या निविदा काढण्यात येऊन, ठेकेदारांच्या नेमणुका करण्यात येतील. चिंचवड, आकुर्डी आणि निगडी हे भाग मेट्रो नेटवर्कला जोडले जातील.

- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

अपेक्षित खर्चाचे वर्गीकरण

६७० कोटी १८ लाख रुपये - महापालिका, केंद्र व राज्य सरकार आणि अन्य निधीतून

९० कोटी ६३ लाख रुपये - विविध कराची रक्कम

१३७ कोटी ८८ लाख रुपये - महापालिका जागा व अन्य वाटा

११ कोटी ५० लाख रुपये - पीपीपी (खासगी भागीदार) तत्त्वानुसार

९१० कोटी १८ लाख रुपये - एकूण खर्च अंदाजे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com