
अविनाश ढगे
पिंपरी : शहरात अल्पवयीन मुलांकडून ५० सीसीवरील दुचाकींचा सर्रास वापर होत आहे. गेल्या आठ दिवसांत शहरातील विविध ठिकाणी झालेल्या अपघात दोन अल्पवयीन चालकांचा बळी गेला आहे. अल्पवयीन मुलांनी केलेल्या मोटार वाहन गुन्ह्यांमध्ये त्यांचे पालक किंवा वाहन मालक यांना जबाबदार धरून तुरुंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे. मात्र, काहीतरी कारणे सांगून गुन्ह्यांतून सुटका करून घेत आहेत. यावरुन ना कायद्याची पर्वा, ना शिक्षेची अशीच मानसिकता पालकांमध्ये वाढत असल्याचे दिसून येते.