
पिंपरी : शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी आवश्यक कच्चा माल पुरविणाऱ्या गाड्यांचीही वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, या बांधकामाच्या साइटमधून किंवा आरएमसी प्लॅंटमधून बाहेर या गाड्या कोणत्याही नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, या गाड्यांच्या चाकांना कधी चिखल लागून येतो, तर खडी रस्त्यावर सांडते. अनेकदा राडारोडा वाहून नेणाऱ्या गाड्यांवर अाच्छादन नसल्याने रस्त्यावर धूळ पसरते. त्यामुळे धुळीचा त्रास होण्यासोबतच रस्त्यावर आलेल्या चिखलामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.