
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रस्त्यांवरील रस्ता ओलांडण्याचे पांढरे पट्टे (झेब्रा क्रॉसिंग) आणि थांबण्याचे पट्टे दिसेनासे झाले आहेत. चौकात सिग्नल लागल्यानंतर वाहनचालकांनी कुठे वाहन थांबवायचे, पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी कोणती जागा असावी, हे स्पष्ट होण्यासाठी ‘झेब्रा क्रॉसिंग स्टॉप लेन’चे पट्टे आखले जातात.