esakal | Pimpri: उर्दू माध्यम शाळा शिक्षकाविना
sakal

बोलून बातमी शोधा

 उर्दू शाळेतील विद्यार्थी.

पिंपरी : उर्दू माध्यम शाळा शिक्षकाविना

sakal_logo
By
आशा साळवी

पिंपरी : उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शाळेत शिक्षकच नसल्याने सुमारे ५०० विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे. शिक्षकच नसल्याने विद्यार्थांच्या शाळेचा दुसराही दिवस हा शिक्षकांविनाच गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.

स्वयंअर्थसहायित योजनेअंतर्गत महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांपासून रुपीनगर, थेरगाव, खराळवाडी, लांडेवाडी, नेहरूनगर व दापोडी या सहा ठिकाणी उर्दू माध्यमाचे इयत्ता ९वीचे वर्ग सुरु केलेले आहेत. त्यानंतर सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून नैसर्गिकवाढीच्या तत्त्वानुसार इयत्ता दहावीचे वर्ग भरत आहेत. त्यासाठी दरवर्षी मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करावी लागते. त्यांची सहा महिन्यांची मुदत संपल्यावर या शिक्षकांची जागा रिक्त होते.

हेही वाचा: पिंपरी : पोलिस भरतीसाठी २३ ऑक्टोबरला लेखी परीक्षा

या शाळेत प्रत्येकी तीन याप्रमाणे १८ उर्दू शिक्षकांची आवश्‍यकता असते. पण शाळेच्या पहिल्यादिवशी एकही शिक्षक उपलब्ध नव्हते. कोरोनोच्या पार्श्वभूमीवर ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत असताना माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन करणे आवश्‍यक होते. परंतु याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. वर्ग सुरु करण्यास येणाऱ्या भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरविण्यासाठी येणाऱ्या खर्चास व वर्ग सुरु करण्यात स्थायी समितीने मान्यता दिलेली आहे. तसेच शिक्षण विभागाकडे पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीने उर्दू शिक्षकांची मागणी सहा महिन्यापूर्वी करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष अखिल मुजावर यांनी दिली.

‘‘या सहा ठिकाणच्या शाळांना मान्यता मिळविण्यासाठी आमच्या संस्थेने खूप कष्ट घेतले आहेत. पण अद्याप शिक्षकांची समस्या कायम आहे. पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटीने शिक्षण विभागाकडे उर्दू शिक्षकांची मागणी सहा महिन्यापूर्वी केली होती. शाळा सुरू होऊन दुसरा दिवस आहे. तरी अद्याप शिक्षकांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

-आकील मुजावर, अध्यक्ष पिंपरी चिंचवड एज्युकेशन सोसायटी

loading image
go to top