माझ्या नादी लागल्यास करीन ३०२; तरुणीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल| Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Video

माझ्या नादी लागल्यास करीन ३०२; तरुणीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल

पिंपरी : इंस्टाग्राम आणि फेसबुकवर व्हिडिओ (Facebook And Instagram Video) बनवणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. यावर कुठलेही बंधन नसल्याने सोशल मिडियावर बरेच तरुण आपल्याला वाटेल त्या भाषेत व्हिडिओ करताना असल्याला पहायला मिळत आहेत. वादग्रस्त आणि आर्वाच्च भाषा वापरण्याच्या कारणावरून याआधी बऱ्याच तरुणांना पोलिसांनी अटक केल्याच्या घटना घडल्या आहेत. याअगोदर व्हिडिओमध्ये कोयता घेऊन धमकी देणाऱ्या पिंपरीतील तरुणाला पोलिसांनी अटक (Police Arrest) केल्याची घटना ताजी असताना असाच एका मुलीचा भाईगिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सदर तरुणी भाईगिरीची भाषा बोलताना दिसत आहे. (Pimpri Young Girl Viral Video)

सदर व्हिडिओतील तरुणी पिंपरीतील थेरगाव येथील असून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती तरुणी म्हणतेय की, ''कुठला डॉन आणि कुठला कोण? माझ्या नादी लागाल तर करील ३०२'' सदर व्हिडिओमध्ये ३०२ म्हणजे खून केल्यानंतर लावलं जाणारं कलम असून ''माझ्या नादाला लागाल तर खून (Murder) केला जाईल'' अशा भाषेत तरुणी बिनधास्तपणे बोलताना दिसत आहे. अजून एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक तरुणी ''शब्दाने शब्द वाढतात म्हणून शिव्या कधीच द्यायच्या नाहीत, शक्यतो भांडणे हाणामारीनेच सोडवायची असतात.'' असं बोलताना दिसंत आहे.

असे वादग्रस्त बोलण्याचे, हातात बंदूक घेऊन किंवा कोयता घेऊन धमकी देण्याचे तरुणांचे व्हिडिओ समोर आले होते पण, तरुणींचे असे वादग्रस्त व्हिडिओ समोर येऊ लागल्याने गुन्हेगारीमध्ये तरुणींचाही समावेश होतोय का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top