
पिंपरी : नोव्हेंबर अखेरची मुदत संपल्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकाम मालकांवर कारवाईचे थेट पावले उचलली आहेत. एकाच दिवसात महापालिकेने विविध पोलिस ठाण्यात तब्बल 27 गुन्हे दाखल केले. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणानेही पुढाकार घेत एक मालकावर गुन्हा दाखल केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
कायद्यानुसार बांधकामासाठी महापालिकेकडे परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, स्थानिक नगरसेवक आणि राजकीय पुढाऱ्यांच्या पाठिंब्यावर अनेकांनी विनापरवानगी बांधकामे केली. अशी बांधकामे पालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बिांधकाम नियंत्रण विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर संबंधितांना प्रशासनाकडून नोटीस बजावण्यास सुरूवात झाली आहे. तरीही बांधकाम थांबवले नाही किंवा केलेले बांधकाम स्वतः:हून पाडले नाही तर महापालिका इमारत मालकावर कायदेशीर गुन्हा दाखल करते.
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गुरुवारी गुन्हे दाखल झालेल्या संबंधितांनी नोटिशीची दखल घेतली नसल्याने पालिकेने थेट गुन्हे दाखल केले आहेत. वाकड ठाण्यात 11, पिंपरी ठाण्यात 14, तर एमआयडीसी भोसरी ठाण्यात दोन असे एकूण 27 गुन्हे महापालिकेकडून दाखल केले आहेत. तर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून चिंचवड ठाण्यात एक गुन्हा दाखल केला.
यांच्यावर गुन्हे दाखल
वाकड ठाणे : अब्दुल अन्सारी, एनूफ अन्सारी (दोघेही रा. सुयोग कॉलनी, रहाटणी), बबन डुंबरे, शांता नाईक, पूजा प्रल्हाद मिसाळ, रुषीकेश पुरुषोत्तम नाईक, गणेश पंडितराव सोमवंशी (सर्व रा. मोरया कॉलनी, विजयनगर, काळेवाडी), रमाकांत शिवराम तिवारी (रा. ओंकार कॉलनी, विजयनगर, काळेवाडी), मनीषा जयवंत कांबळे (रा. भारत कॉलनी, नढेनगर, काळेवाडी), तुकाराम व्यंकट माने (रा. साईसागर कॉलनी, रहाटणी), प्रकाश रामचंद्र खोले (रा. मंगल नगर, लेन क्रमांक 3, थेरगाव), लक्ष्मण सीताराम कुदळे (रा. गणेशनगर, थेरगाव), लक्ष्मण विश्वनाथ म्हमाणे (रा. दत्तनगर, थेरगाव).
पिंपरी ठाणे : किरण श्रीधर माळवदकर, अजित रघुनाथ मोरे, उस्मान एम. पठाण , विनोद गणेश प्रसाद, मुरली आर्सन ओ.टी, सेथुरामण पशुपर्थी अय्यर, संतोष प्रद्मुम्नकुमार डुडु (सर्व रा. अजमेरा हौसिंग सोसायटी), बबनराव देविचंद कलापुरे (रा. नेहरूनगर), शिवाजी बाबूराव बंदपट्टे (रा. खराळवाडी), इरफान अन्सारी (रा. बकाऊ उल्फ को. हौसिंग सोसायटी, खराळवाडी), तानाजी बानू दरेकर, गोविंद सावळाराम एकबोटे (दोघेही रा. अजमेरा हाउसिंग सोसायटी), अभंग मानसिंग विठोबा, शकुंतला अमृता पातारे (दोघेही रा. नेहरूनगर).
भोसरी एमआयडीसी ठाणे : अस्लम अजमुद्दीन इनामदार (रा. इंद्रायणी पार्क कॉलनी, बोऱ्हाडेवाडी, मोशी), शांताराम लक्ष्मण आल्हाट , चंद्रकांत दत्तू आल्हाट, राजू दत्तू आल्हाट (रा. नागेश्वरनगर, बोऱ्हाडेवाडी, मोशी).
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रेखा शिंदे, तुकाराम शिंदे, भारती भारंबे (सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्यावर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.