
पिंपरी : गरिबांच्या मुलांना विनामूल्य सीबीएसई शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने वाकडमध्ये पहिली आधुनिक आणि भव्य सीबीएसई शाळा उभारली जात आहे. चालू एप्रिल महिन्यात एकीकडे सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र दुसरीकडे इमारतीची अंतर्गत कामे अद्याप अपूर्ण असल्याने यंदा तरी सीबीएसईचा वर्ग भरेल अथवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची ‘घर का ना घाट का’ अशी अवस्था झाली असून, पालकांची धाकधूक वाढली आहे.