esakal | तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी सुसज्ज ‘प्ले रूम’
sakal

बोलून बातमी शोधा

Play Room

तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन लहान मुलांसाठी सुसज्ज ‘प्ले रूम’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसऱ्या लाटेचा (Third Wave) सर्वाधिक संसर्ग (Infection) लहान मुलांना (Children) होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरीतील (Pimpri) नवीन जिजामाता रुग्णालय (Jijamata Hospital) सुसज्ज ठेवले आहे. लहान मुले आनंदी राहावीत, रमावीत अशा पद्धतीने प्रत्येक खोलीची रचना केली आहे. मुलांसोबत पालकही राहू शकतील, अशा हिशोबाने बेडची (Bed) रचना केली आहे. भिंतीवर लावलेली कार्टून, सभोवताली टांगलेले रंगीबेरंगी फुगे व जमिनीवर पसरलेली खेळणी यामुळे आपण रुग्णालयात आलो आहोत, असे वाटत नाही. (Play Room Equipped for Children Considering the Danger of the Third Wave)

रुग्णालयात १४ वर्षांखालील मुलांसाठी तीन विभाग तयार केले आहेत. सध्या ३५ खाटा असून शंभर खाटांचे नियोजन आहे. दुसऱ्या वॉर्डचे काम सुरू आहे. खोलींच्या भिंतींवर डोरेमॉन, भीम, मोगली, मिकीमाउस, मारिओ, कुंकुपांडा, शिंचेन शिचुका व प्राण्यांची लक्षवेधी चित्रे लावली आहेत. त्याचप्रमाणे बेबी चेअर, कॅरम, बोर्ड, शेडकार्ड, रिंग्स, खडू मुलांना खेळण्यासाठी ठेवली आहेत. रुग्णालयाच्या डॉ. संगीता तिरुमणी या विभागाचे कामकाज पाहत आहेत.

हेही वाचा: लोणावळ्यात पर्यटकांची तुडुंब गर्दी; कोरोनाचा पडला विसर

कोणतीही खेळणी अणकुचीदार नाहीत. मुलांना इजा होणार नाही. मुलांना खेळण्यासाठी जागा ठेवली आहे. ऑक्सिजन टॅंकचे काम सुरू आहे. अधिक खाटा वाढविण्याचे काम सुरू आहे.

- डॉ. बाळासाहेब होडगर, वैद्यकीय अधिकारी, जिजामाता रुग्णालय

मनुष्यबळ

  • २२ - नर्स

  • १३ - बालरोग तज्ज्ञ डॉक्टर

loading image