पिंपरी-चिंचवडमध्ये 'या' तीस मार्गांवर पीएमपी धावणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी परिसरातील कामगार आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीच्या निगडी, भोसरी आणि पिंपरी डेपोमार्फत एकूण 30 मार्गांवर 26 मेपासून बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर, एमआयडीसी परिसरातील कामगार आणि प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीच्या निगडी, भोसरी आणि पिंपरी डेपोमार्फत एकूण 30 मार्गांवर 26 मेपासून बससेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, 10 वर्षांखालील आणि 65 वर्षांपुढील प्रवाशांना मनाई करण्यात आली असून, प्रत्येक बसमध्ये मास्क असलेल्या केवळ 21 प्रवाशांनाच मुभा देण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे महानगर परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, पीएमपी चालक-वाहक प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क लावण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. मार्गावरील बसची दैनंदिन स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करून पाठविल्या जाणार आहेत. डेपोव्यतिरिक्त बस स्थानकावर सॅनिटायझिंग पथकाद्वारे नेमणूक करून बसची स्वच्छता केली जाणार आहे. नियंत्रक तथा तपासणीस (कंट्रोलर-चेकर) हे बसमध्ये 21 प्रवासी संख्येच्या मर्यादेचे पालन होत आहे अथवा नाही याची खात्री करणार आहेत. चालक-वाहक यांनी नेमून दिलेल्या फेऱ्यांचे वेळा काटेकोरपणे पाळण्याच्या सूचनाही पीएमपी प्रशासनाने दिल्या आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बसमार्ग क्रमांक/ बसस्थानकपासून ते बसस्थानकपर्यंतचे ठिकाण :

- 305 निगडी ते वडगाव/ नवलाख उंबरे
- 306 डांगे चौक ते हिंजवडी-माण फेज 3
- 330 आकुर्डी रेल्वे स्थानक ते चिखली
- 340 निगडी ते चऱ्होलीगाव /आळंदी
- 343 वडगाव मावळ ते चाकण, आंबेठाण चौक
- 350 निगडी ते देहूगाव
- 367 निगडी ते भोसरी
- 368 निगडी ते कामशेत
- 369 निगडी ते चाकण /वासोली
- 372 निगडी ते हिंजवडी-माण फेज 3
- 381 चिखली ते हिंजवडी-माण फेज 3
- 309 आळंदी ते देहूगाव
- 324 बीआरटी भोसरी ते हिंजवडी-माण फेज 3
- 345 बीआरटी भोसरी ते हिंजवडी-माण फेज 3
- 351 आळंदी ते जांबे
- 358 भोसरी ते राजगुरुनगर
- 358 भोसरी ते चाकण, आंबेठाण चौक
- 361 भोसरी ते आळंदी
- 120 भोसरी ते म्हाळुंगे एमआयडीसी
- 302 पिंपरीगाव ते भोसरी
- 304 चिंचवडगाव ते भोसरी
- 326 पिंपरीगाव ते चिखली
- 327 हिंजवडी-माण फेज 3 ते आळंदी
- 331 चऱ्होलीगाव ते रहाटणी गावमार्गे चऱ्होली फाटा
- 331 भोसरी ते रहाटणीगाव
- 335 डांगे चौक ते जांबे/ नेरे दत्तवाडी
- 355 चिखली ते डांगे चौक
- 362 वायसीएम हॉस्पिटल ते आळंदी
- 380 भोसरी ते हिंजवडी-माण फेज 3
- 313 चिंचवडगाव ते चांदखेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus will run on 30 routes in Pimpri-Chinchwad