
अविनाश ढगे
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या बस पासची फाइल गेल्या दोन महिन्यांपासून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध टेबलांवर फिरत आहे. परिणामी, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पास मिळत नाहीत. तसेच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना वार्षिक रकमेच्या २५ टक्के रक्कम भरून मिळणाऱ्या पासचा प्रस्तावही धूळ खात पडला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.