
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी खासगी शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ७५ टक्के सवलतीचे अनुदानित बस प्रवास पासचे वितरण शनिवारपासून (ता. २८) सुरू झाले आहे. पण, विद्यार्थ्यांच्या बस पाससाठीदेखील हद्दीचा वाद सुरू झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील खासगी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएमपीएमएलकडून बस पास देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे पास केंद्रावर गेलेल्या विद्यार्थी आणि पालकांना रिकाम्या हातांनी परतावे लागत आहे.