PMRDA Homes : ‘पीएमआरडीए’च्या सदनिका निकृष्ट; लाभार्थ्यांकडून तक्रार

पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ च्या गृहयोजनेंतर्गत हजारो घरे बांधण्यात आली आहेत. परंतु; ही घरे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार लाभार्थी करू लागले आहेत.
Pmrda Moshi Project
Pmrda Moshi Projectsakal

पिंपरी - पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ च्या गृहयोजनेंतर्गत हजारो घरे बांधण्यात आली आहेत. परंतु; ही घरे निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार लाभार्थी करू लागले आहेत. घराचे दरवाजे, बाल्कनी, खिडक्या यांना वापरलेल्या काचा हलक्या प्रतीच्या आहेत. फरशा उखडू लागल्या आहेत. अनियमित पाणीपुरवठा, सदनिकांमध्ये गळती होत आहे.

नागरिकांना परवडणारी घरे देण्यासाठी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पेठ क्रमांक १२ येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इडब्ल्‍यूएस गटासाठी ३३१७ सदनिका व अत्यल्प उत्पन्न (एलआयजी) गटासाठी १५६६ सदनिका आहेत. या गृहप्रकल्पात एकूण ४ हजार ८८३ सध्या घरे बांधून झाली आहेत. या गृहप्रकल्पातील सदनिकांची लॉटरी पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेची पूर्ण रक्कम भरलेली आहे. त्यांच्या समवेत करारनामे केले आहेत. काही लाभार्थी राहण्यास आले आहेत.

पाण्याच्या टाकीचे झाकण प्लास्टिकचे आहे. ते खूप धोकादायक आहे. खिडकीच्या काचा निखळून खाली पडल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेवढ्या खर्चात ‘स्लाइडिंग’ खिडकी देता आल्या असता. एका इमारतीमध्ये ८८ सदनिका आहेत. वाहनतळाची सोय पुरेशी नाही. इमारतीमध्येच दुकाने काढलेले आहेत. आमचे हक्काचे वाहनतळसुद्धा दुकाने काढून विकले आहेत, अशी तक्रार लाभार्थी करत आहेत.

देखभाल दुरुस्ती आकारून सुविधांचा अभाव

लाभार्थ्यांकडून एक वर्षाच्या देखभालीचे चौदा हजार रुपये घेतले आहेत. पण अजूनही सुरक्षारक्षक पुरेसे नाहीत. खासगी कंपनीला स्वच्छतेचे काम दिलेले आहे. ते फक्त आवार स्वच्छ करतात. बिल्डिंगमधील स्वच्छता करणार नाही, असे सांगतात. गेट तीन आहेत, पण सुरक्षारक्षक फक्त २ आहेत, तेही २४ तासांसाठी नाहीत. त्यांना बसायला खुर्ची, टेबल, रजिस्टर काहीही सुविधा दिली नसल्याचे लाभार्थी नयना बोरसे यांनी सांगितले.

गृहप्रकल्पात असलेल्या त्रुटी

  • ‘पीएमआरडीए’ने सांगितलेल्या वेळेनंतर १ वर्षाने ताबा दिला गेला.

  • सदनिकांमध्येमध्ये गळती आहे.

  • पाण्याच्या टाक्यांमधून गळती होत आहे.

  • पाणी नियमित येत नाही आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नाही.

  • व्हॉल्व्ह खराब झालेले आहेत.

  • बाल्कनी, खिडक्या यांना वापरलेल्या काचा हलक्या प्रतीच्या आहेत.

  • सदनिकेमधील फरशा तुटलेल्या आहेत.

  • किचन ओट्यावर पाणी साचत आहे. उतार दिला नाही.

  • सर्व दरवाजे हलक्या दर्जाचे वापरले आहेत.

  • पार्किंगची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.

  • घरातील स्वच्छतागृहाचे फ्लश सुरू केले नाहीत.

  • लिफ्ट बऱ्याचदा बंद पडतात.

सदनिकेमधील तुटलेल्या फरशा त्वरित दुरुस्त केल्या आहेत. एसटीपीची वाहिनी सुरू झाल्यावर स्वच्छतागृहाचे फ्लश सुरू केले जाणार आहेत.

- प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता, पीएमआरडीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com