
Pimpri Chinchwad News
Sakal
पिंपरी : पिंपरीतील सेक्टर क्रमांक १२ येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विकसित केलेल्या गृहसंकुलात प्रति सदनिकेप्रमाणे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून न दिल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. कमी उत्पन्न गटाच्या (एलआयजी) एक हजार ५६६ सदनिकांसाठी कागदोपत्री ७८३ पार्किंग दाखविण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात केवळ ४५० पार्किंग उपलब्ध आहेत. उर्वरित ३३३ पार्किंग अस्तित्वातच नसल्यामुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.