
पिंपरी : हिंजवडीतील वाहतूक कोंडी व खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या समस्या कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ‘पीएमआरडीए’ या भागांत विविध रस्त्यांची आखणी करत आहे. या रस्त्यांसाठी सध्या संबंधित भागात सर्वेक्षण सुरू आहे. तसेच नवीन रस्ते विकसित करण्यासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी हिंजवडी भागातील शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली.