Ring Road Project : पीएमआरडीएच्या रिंगरोड प्रकल्पासाठी भू-संपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले आहेत.
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) रिंगरोड प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यासाठी जमीन मोजणी आणि भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवावेत, असे निर्देश आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिले आहेत.