'पीएमआरडीए'ची उपमुख्यमंत्र्यांसोबत उद्या 'या' विषयांवर बैठक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सोमवारी (ता. 21) सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन आढावा बैठक होणार आहे.

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सोमवारी (ता. 21) सायंकाळी पाच वाजता ऑनलाइन आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत रिंगरोड, टीपीस्कीम व मेट्रोची सद्यःस्थिती जाणून घेतली जाणार आहे. यावेळी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे, नगर विकास विभागाचे सचिव, पीएमआरडीएचे पदाधिकारी व प्रमुख अधिकारी उपस्थित राहतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पुणे विद्यापीठाजवळील दोन उड्डाणपूल पाडल्यानंतर सुरळीत वाहतुकीसाठी नवीन पुलाच्या आराखड्याचे काय, मेट्रो कास्टिंग यार्ड व कार डेपोच्या जागेचाही प्रश्‍न अद्यापपर्यंत प्रलंबित आहे. मेट्रोचा जिओ टेक्‍निकल सर्व्हेनंतर मेट्रो पिलरच्या उभारणीसाठी जमिनीचे स्ट्रक्‍चर, पाया व सॉईल तपासणीचे काम अद्यापही पुढे सरकलेले नाही. सध्या पीएमआरडीएने कोविड जम्बो सेंटर उभारणीवर भर दिला. त्यामुळे मेट्रो व माण-महाळुंगे टीपी स्कीममधील प्रश्‍न अद्यापही प्रलंबित आहेत. रिंगरोडबाबतही ठोस निर्णय झालेला नाही. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दरम्यान, दर महिन्यातील पहिला व तिसऱ्या सोमवारी पीएमआरडीची आढावा बैठक टास्क फोर्सअंतर्गत उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMRDA's review meeting with Deputy Chief Minister Ajit Pawar on Monday 21 september