लोणावळ्यात पोलिसांची मोठी कारवाई; नामांकित हॉटेलात जुगार खेळणाऱ्यांना केली अटक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

  • जुगार खेळणाऱ्या ७४ जणांना अटक, १२ तरुणींचा समावेश

लोणावळा (पुणे) : लोणावळ्यातील महामार्गालगत मुख्य चौकातील कुमार रिसॉर्टमध्ये सोमवारी (ता. ७) मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकत जुगार खेळणाऱ्या ७४ जणांना अटक केली आहे. यामध्ये १२ तरुणींचा समावेश आहे. 

हॉटेलमालक धीरज कुमार आयलानी, व्यवस्थापक अन्वर शेख यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा उपविभागीय अधिकारी व सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी ही कारवाई केली. अटक केलेल्यांमध्ये मुंबई, गुजरात येथील आहे.

(सविस्तर वृत्त लवकरच)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrest gamblers in lonavla