मावळ : कामशेतमध्ये अन्न पदार्थाचा साठा करणाऱ्या दुकानदाराला अटक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

किराणा मालाच्या दुकानात प्रतिबंधित असलेल्या अन्न पदार्थांचा साठा केला.

कामशेत (ता. मावळ) : येथील किराणा मालाच्या दुकानात प्रतिबंधित असलेल्या अन्न पदार्थांचा साठा केला. याप्रकरणी एकाला कामशेत पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत पोलिस हवालदार संतोष वामन घोलप यांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भरत चंपालाल जैन (वय ४८, रा. कामशेत बाजारपेठ) या दुकानदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत गावच्या हद्दीत शिवाजी चौकाजवळ शिवम ट्रेडर्स हे किराणा मालाचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागील खोलीत आरोपीने प्रतिबंधित असलेल्या अन्न पदार्थांचा विक्रीच्या उद्देशाने साठा करून ठेवला. याबाबत पोलिसांना गुप्त माहिती होती. त्यानुसार निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शनिवारी (ता. १९) सायंकाळी धाड टाकून आरोपीला ८७ हजार ६३७ रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police arrested shopkeeper for stockpiling food in kamshet

Tags
टॉपिकस
Topic Tags: