
पिंपरी - नाकाबंदीच्या ठिकाणी तपासणीसाठी मोटार थांबविल्याच्या रागातून एकाने पोलिसांना मारहाण केली. तसेच पोलिसांच्या वाहनातून नेत असताना डोके आपटून या वाहनाची काच फोडली. ही घटना बोपखेल येथे घडली.
महेंद्र रविंद्र वाघमारे (वय 45, रा. रामनगर, बोपखेल ) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय कामठे यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी (ता.10) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास फिर्यादी व इतर पोलिसांनी बोपखेल फाटा येथील नाकाबंदीच्या ठिकाणी आरोपीची मोटार तपासणीसाठी थांबविली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या रागातून आरोपीने फिर्यादीच्या तोंडात थापड मारली तर पोलिस कॉन्स्टेबल उमेश जाधव यांना दगड फेकून मारीत धक्काबुक्की, शिवीगाळ करून इतरांनाही दगड मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या वाहनातून नेत असताना त्याने वाहनाच्या काचेवर डोके आपटून काच फोडली. दिघी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.