
पिंपरी : पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातील केवळ गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन पोलिस त्याचा कसून तपास करत आहेत. त्यामुळे इतर गुन्हे कागदोपत्री नोंद होण्यापुरतेच मर्यादित राहत असल्याचे चित्र आहे. असे होत असल्याने इतर गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाणही अत्यल्प असल्याचे समोर येते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने गंभीर गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांचीही दखल घेत तपास करून पीडित व्यक्तीला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.