esakal | पोलिसानेच केला पत्नीचा छळ; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिसानेच केला पत्नीचा छळ; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासह किरकोळ कारणावरून पोलिस पतीसह सासू, सासरा व नणंद यांनी विवाहितेचा छळ केला.

पोलिसानेच केला पत्नीचा छळ; चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यासह किरकोळ कारणावरून पोलिस पतीसह सासू, सासरा व नणंद यांनी विवाहितेचा छळ केला. शिवीगाळ करीत विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पती नितीन विठ्ठल राठोड, सासू शांताबाई राठोड, सासरा विठ्ठल फुलाजी राठोड (सर्व रा. ज्ञानदीप कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) व नणंद नीलम श्रीकांत चव्हाण (रा. कर्जत, रायगड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी याचा पती चिंचवड पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असून, त्याने फिर्यादीला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केली. सासूने किरकोळ कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ करीत फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून पैसे आणण्यास सांगितले. सासऱ्याने देखील दारू पिऊन फिर्यादीला शिवीगाळ केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नणंदने फोनवरून फिर्यादीला घरातून हाकलून देण्यास सांगितले. त्यामुळे सासू वारंवार फिर्यादीला माहेराहून पैसे आणण्यास सांगून शिवीगाळ करीत असे. फिर्यादीच्या आई, वडील, भाऊ तसेच नातेवाइकांनी दोन वेळा राठोड यांच्या घरी बैठक घेऊन फिर्यादीच्या पतीला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बैठकीत त्याने फिर्यादीच्या नातेवाइकांना उलटसुलट बोलून हाकलून दिले.