esakal | नदीत बुडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Drown

सांगवीतील वेताळनगर येथील मुळा नदी पात्रात बुडून पुणे ग्रामीण पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. अमित सुभाष खांडेकर (वय 37, रा. पोलिस वसाहत, चव्हाणनगर, पाषाण) असे या घटनेत मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खांडेकर हे पुणे पोलिस मुख्यालयात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. ते शुक्रवारी (ता.20) सकाळी अकराच्या सुमारास वेताळनगर येथील नदी पात्रात उतरले. घाटावर त्यांनी कपडे काढून ठेवले होते. दरम्यान, पाण्यात पोहत असताना ते बुडाले.

नदीत बुडून पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी - सांगवीतील वेताळनगर येथील मुळा नदी पात्रात बुडून पुणे ग्रामीण पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. 

अमित सुभाष खांडेकर (वय 37, रा. पोलिस वसाहत, चव्हाणनगर, पाषाण) असे या घटनेत मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. खांडेकर हे पुणे पोलिस मुख्यालयात पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. ते शुक्रवारी (ता.20) सकाळी अकराच्या सुमारास वेताळनगर येथील नदी पात्रात उतरले. घाटावर त्यांनी कपडे काढून ठेवले होते. दरम्यान, पाण्यात पोहत असताना ते बुडाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शनिवारी (ता.21) दुपारी वेताळनगर घाटावर त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह रूग्णालयात पाठविण्यात आला. खांडेकर विवाहित असून कुटुंबासह चव्हाणनगर पोलिस वसाहतीत राहत होते. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil