esakal | Bhosari : तडीपार आरोपीची पोलिसांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की
sakal

बोलून बातमी शोधा

 तडीपार आरोपीची पोलिसांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की

Bhosari : तडीपार आरोपीची पोलिसांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : तडीपार असतानाही शहरात आलेल्या आरोपीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याने शिवीगाळ, धक्काबुक्की करीत बघून घेण्याची धमकी दिली. हा प्रकार भोसरीतील (bhosari) बालाजीनगर झोपडपट्टी येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सत्यशील सिद्धार्थ इंगोले (वय २७, रा. बालाजीनगर पॉवरहाऊस, भोसरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस नाईक गणेश महाडीक यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वीच तो पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता शहराच्या हद्दीत आला.

याबाबतची माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी कारवाई करण्यासाठी रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास बालाजीनगर येथील आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. तसेच ‘तुमच्याकडे बघून घेतो’, अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एमआयडीसी भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत

loading image
go to top