
लॉटरीच्या नावाखाली अवैधरित्या सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर निगडी पोलिसांना छापा टाकला.
निगडीत जुगार अड्ड्यावर छापा; वीस जणांना अटक
पिंपरी : लॉटरीच्या नावाखाली अवैधरित्या सुरू असलेल्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर निगडी पोलिसांना छापा टाकला. या कारवाईत वीस जणांना अटक केली असून, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
विजय शंकर रोमन (वय 48, रा. लक्ष्मीनगर, निगडी), मुन्ना ऊर्फ विजयकुमार महादेव शर्मा (वय 35, रा. साने चौक, चिखली), शरद सुभाषचंद्र केशरवाणी (वय 32), अमीत लालचंद केशरवाणी (वय 42, रा. दिनदयाळनगर), बशीर हैदरशाब शेख (वय 38, रा. चक्रपाणी वसाहत, राधाकृष्णनगर, भोसरी), शिवराज मल्लीनाथ पाटील (वय 26, रा. दत्तवाडी), किशोर पूनमचंद तावडे (वय 42, रा. बिजलीनगर, चिंचवड), लक्ष्मण उमेश केशरवाणी (वय 41, रा. दिनदयाळनगर, भारती विद्यापीठ), अकलेश लालचंद केशरवाणी (वय 43, रा. यमुनानगर, निगडी), विशाल सुरेंद्र राम (वय 22, रा. साने चौक, चिखली), अंकुश सदाशिव राऊत (वय 45, रा. काळेवाडी), राजवीर पांडुरंग पाटील (वय 27, रा. साईनाथनगर, निगडी), कमलाकर वसंत शिंपी (वय 46, रा. रूपीनगर, चिखली), सुरेंद्र थेरयी कुमार (वय 42, रा. हुरवळे चाळ, आकुर्डी), शिवराज कुसाप्पा कुंभार (वय 44, रा. ताम्हाणे वस्ती, साने चौक, चिखली), चेतन चंद्रकांत पाटील (वय 22, रा. साईनाथनगर, निगडी), वसंत रामचंद्र चांदे (वय 60, रा. चिखली), शरद अर्जुन पाटील (वय 42, रा. भुई चाळ, चिंचवड), अहमद गफुर खान (वय 79, रा. कसबा पेठ, पुणे), नागनाथ दगडू लांबतुरे (वय 52, रा. ओटास्कीम, निगडी) यांना अटक केली.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
तसेच, धिरेंद्र सिंग (वय 45, रा. मोरे वस्ती, चिखली), रितेश केसरवाणी (वय 34, रा. यमुनानगर, निगडी) व सुनील वाघ (वय 28), नीरज केसरवाणी (वय 42, रा. यमुनानगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. निगडी टिळक चौकातील भोसरी रोडवरील पीएमपी बसथांब्याच्या पाठीमागे एका लॉटरी सेंटरवर लॉटरीच्या नावाखाली अवैधरित्या ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून पोलिसांनी आरोपींना अटक केली. तेथून दुचाकी, संगणक, लॅपटॉप, असा एकूण चार लाख 17 हजार 435 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Police Raid Gambling Nigadi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..