मकर संक्रातीला खणांची होईल चांगली विक्री; कुंभार व्यावसायिक आशादायी

 Potter businessman are Hopeful about Selling mud Pots on Makar Sankranti
Potter businessman are Hopeful about Selling mud Pots on Makar Sankranti

भोसरी : ऐन उन्हाळ्यातच कोरोना व्हायरसच्या संसर्गाममुळे लॅाकडाऊन सुरू झाले. त्याचप्रमाणे गरम पाणी पिण्याचे संदेश नागरिकांमधून येऊ लागल्याने माठाची विक्री होऊ शकली नाही.  दिवाळी-दसरा सणातही पणत्या, खण, घट विकले गेले नाहीत. लॅाकडाऊनमुळे उत्पादनही करता आले नाही. मात्र आता येणाऱ्या मकर संक्रातीसाठी खणांचे उत्पादन सुरू केले आहे. या मकर संक्रातीला खण चांगल्या प्रकारे विकले जाण्याची आशा भोसरी एमआयडीसीतील कुंभारकीचे पारंपारिक काम करणाऱ्या राधाबाई अर्जून कुंभार व्यक्त करत होत्या.

कोरोना व्हायरसचा संसर्ग थोपविण्साठी मार्च महिन्यातच लॅाकडाऊन सुरू झाले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. लॅाकडाऊन उठविल्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होऊ लागले आहेत. मात्र लॅाकडाऊननंतर कुंभारकीचा व्यवसाय करणाऱ्यांना येणारा नववर्षातील मकर संक्रातीचा पहिल्याच सणासाठी खण, झाकणी तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. भोसरी एमआयडीसीतील इएल ६० ब्लॅाकमध्ये परमेश्वर दिलीप कुंभार व राधाबाई कुंभार हे गेल्या चाळीस वर्षापसून येथे कुंभारकीचा पारंपारीक व्यवसाय करत आहेत.  मकर संक्रांतीच्या सणासाठी कुंभार बांधवांची साहित्य बनविण्याची लगबग सुरू आहे. या ठिकाणी खणांची भली मोठी रास लागलेली पहायला मिळते.  

या विषयी परमेश्वर कुंभार म्हणाले,  "दिवाळीपासून मकर संक्रातीसाठी खण आणि झाकणी तयार करण्याच्या कामाला सुरवात करण्यात येते.  साधी माती असल्यास मातीच्या भांड्याला चिरा पडतात. म्हणून यासाठी पोयटा माती (नदी किनारी पावसाने वाहून आलेली माती)  लागते.  ही माती विकत आणावी लागते.  ती चाळून घेऊन त्याचा लगदा करावा लागतो. पूर्वी भाजणीसाठी या मातीत घोड्याची लीद मिसळली जायची. आता मात्र घोड्याची लीद सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे भाजणीसाठी मातीत लाकडी भुसा मिसळला जातो. नवीन वर्षात येणार मकर संक्रातीचा पहिल्याच सणासाठी खण बनविण्याची लगबग सुरू आहे. या सणात खण आणि झाकणीला चांगला भाव मिळण्याची आशा आहे.  कोरोना काळातील आठ महिने काम बंदमुळे झालेले आर्थिक नुकसान या सणाला थोडेफार भरून निघण्याची आशा निर्माण झाली आहे."


पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड
''पूर्वी कुंभार मातीची भांडी बनविण्यासाठी हाताने फिरणाऱ्या चाकाचा उपयोग करत असत. आता मात्र काही कुंभार बांधवांद्वारे या चाकाला विद्युत मोटार लावली आहे. मोटारच्या सहाय्याने चाक फिरवले जाते व कुंभार हवी तशी मातीची भांडी तयार करतात. मात्र माठ, रांजण यासारखी मातीची मोठी भांडी तयार करण्यासाठी या मोटार लावलेल्या चाकाचा उपयोग होत नसल्याचे अजय कानगुले सांगतात.  यासाठी पारंपारिक चाकाचाच उपयोग करण्यात येत असल्याची पुष्टीही ते जोडतात.''
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com