
चिंचवड : गेल्या आठवडाभरापासून चिंचवडमधील इंदिरानगर परिसरातील नागरिकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शुक्रवारी (ता.२६) पुन्हा एकदा उच्चदाबाच्या वीजपुरवठ्यामुळे पाच ते सहा घरांतील टीव्ही, लॅपटॉप, वॉशिंग मशिन, एसी, मोटार पंप यासारखी महागडी उपकरणे जळाली.