Pimpri : लोणावळ्याचा राष्ट्रपतींकडून गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणावळ्याचा राष्ट्रपतींकडून गौरव

लोणावळ्याचा राष्ट्रपतींकडून गौरव

लोणावळा : केंद्र सरकारच्यावतीने देशभर राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियान- २०२०-२१ मध्ये लोणावळा ‘स्वच्छ शहर’ ठरले असून, एक लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक मिळवला आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी हा पुरस्कार आज स्वीकारला. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती रचना सिनकर, नगरसेवक श्रीधर पुजारी, राजू बच्चे, देविदास कडू, नितीन आगरवाल, प्रमोद गायकवाड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव, तत्कालीन मुख्याधिकारी रवी पवार आदी उपस्थित होते.

सलग चौथ्यांदा लोणावळा शहराने स्वच्छ शहरांच्या यादीत मानाचे स्थान मिळवले आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, तत्कालीन मुख्याधिकारी सचिन पवार यांच्या नेतृत्वाखाली लोणावळ्याने २०१९ मध्ये देशात दुसरे तर सन २०१८ मध्ये सातवा क्रमांक पटकावला होता. लोणावळ्याने कचरामुक्त शहर व सर्वाधिक स्वच्छ व हागणदारी मुक्त शहर असे दोन पुरस्कार पटकाविले आहेत.

लोणावळाकरांनी स्वच्छतेच्या बाबतीत साथ दिली. अनेक संस्था, संघटनांचा पाठिंबा मिळाला. यामुळेच लोणावळा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत यश मिळवत मानाचे स्थान मिळवले आहे. आता शहर अधिक स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांवर आहे.

- सुरेखा जाधव, नगराध्यक्षा, लोणावळा

loading image
go to top