पिंपरी - खासगी सावकारांकडून कर्ज घेतल्यानंतर त्यावर खासगी सावकार स्वतःच्या नियमाप्रमाणे दर महिन्याला दहा ते बारा टक्के व्याज आकारतो. अशा प्रकारे अव्वाच्या सवा व्याज आकारल्याने कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची मुद्दल फिटण्याऐवजी व्याजच भरावे लागते..आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर सावकाराकडून मात्र व्याजासाठी तगादा सुरूच राहतो. या दलदलीत फसल्यानंतर सर्वच मार्ग बंद झाल्याचे जाणवल्याने काहीजण जीवन संपविण्यापर्यंतचा टोकाचा निर्णय घेतात. असाच प्रकार चार दिवसांपूर्वी चिंचवड येथे घडल्याने खासगी सावकारी एखाद्याच्या जिवावर बेतत असल्याचे समोर येते.दरम्यान, बेकायदा सुरू असलेल्या सावकारीबाबत आयुक्तालयाच्या हद्दीत मागील सहा वर्षांत अवघे पाच गुन्हे दाखल झाले आहेत. तरी, बेकायदा सावकारी करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे..शहरासह परिसरात खासगी सावकारांची पाळेमुळे घट्ट रूजल्याचे दिसून येते. काहीजण गरजेपोटी सावकाराकडून कर्ज घेतात.मात्र, सावकार मोठ्या प्रमाणात व्याज आकारून संबंधित व्यक्तीला आपल्या जाळ्यात अडकवतो. कर्ज घेतल्यानंतर व्याजापोटी मोठा परतावा देऊनही मुद्दल तशीच राहिल्यास कर्जदार हवालदिल होतात. काही सावकार दमदाटी करून रक्कम वसूल करतात. यामध्ये कर्जदाराला मारहाण करण्यापर्यंतचे प्रकार घडतात. मात्र, तक्रारी दाखल होत नाही. सावकारावरील कारवाईचे मागील सहा वर्षांत अवघे पाच गुन्हे दाखल झाले आहेत..खासगी सावकार अव्वाच्या सव्वा व्याज आकारतात. त्यामुळे पैसे घेणारा व्यक्ती त्यामध्ये अडकून जातो. व्याज भरूनही कर्ज फिटत नसल्याने काही जण टोकाचा निर्णय घेतात. अशा बेकायदा कारभारावर कठोर कारवाईची गरज आहे.- प्रताप दहितुले, नागरिकबेकायदा जादा व्याज घेऊन खासगी सावकारी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते. असे प्रकार कोणाबाबत घडत असल्यास तक्रार देण्यासाठी पुढे यावे.- विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.रिक्षाचालकाची आत्महत्याखासगी सावकारांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून राजू नारायण राजभर (वय ४५, रा. साईबाबानगर, चिंचवड स्टेशन) यांनी शुक्रवारी (ता. ३) राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. आत्महत्येपूर्वी राजभर यांनी व्हिडिओ तयार करण्यासह चिठ्ठीही लिहिली असून, त्यामध्ये सर्व कैफियत मांडली आहे..गुन्हा दाखल करण्याची तरतूदखासगी सावकार बेकायदा भरमसाट व्याज आकारतात. वर्षाला नाहीतर महिन्याला तब्बल दहा ते बारा टक्के व्याज आकारले जाते. मुद्दलपेक्षा व्याजाची रक्कमच डोईजड होते. हे व्याज भरता भरता आणखी दुसरे कर्ज काढावे लागते. त्यातून संबंधित व्यक्ती आणखी आर्थिक संकटात अडकतो. दरम्यान, महाराष्ट्र सावकारी अधिनियमांच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.