पिंपरी : बेळगावमधील भाजपच्या शिवद्रोही कृतीचा मराठा क्रांती मोर्चातर्फे निषेध

सकाळ वृत्तसेवा
Monday, 10 August 2020

बेळगावमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने भाजप सरकारच्या शिवद्रोही कृतीचा जाहीर निषेध मराठा क्रांती मोर्चा पिपंरी-चिंचवड यांच्या वतीने केला.

पिंपरी : बेळगावमधील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याने भाजप सरकारच्या शिवद्रोही कृतीचा जाहीर निषेध मराठा क्रांती मोर्चा पिपंरी-चिंचवड यांच्या वतीने केला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा डांगे चौक थेरगाव येथे सोमवारी (ता. १०) सोशल डिस्टन्सिंचे पालन करून भगवे झेंडे फडकवण्यात आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठा क्रांती मोर्चा समन्व्यक मारुती भापकर म्हणाले, ''कर्नाटक सरकार जाणूनबुजून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वाद निर्माण करून प्रांतिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटक सरकारने अनेक वेळा महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रात असणारे शिवभक्त यांच्या भावना दुखवण्याचं काम केलं आहे. यातून सीमा भागात असणाऱ्या मराठा बाधंवाना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे. भावनिक मुद्यावर घाणेरडं राजकारण हे भाजप सरकार वारंवार करत आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या वेळी  मोदीजींनी छत्रपतींचा आशीर्वाद मागितला आणि कर्नाटकमध्ये त्यांच्याच पक्षाच्या सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करताना दिसून येत आहे. यातून भाजप पक्षाचा दुटप्पीपणा दिसून येत आहे. म्हणून या नीच कृतीचा जाहीर निषेध पिपंरी चिंचवड मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने  करण्यात आला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी कर्नाटक भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक  प्रकाश जाधव यांनी  सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक महापुरुषांची बदनामी करणाऱ्या भाजपला भविष्यात खूप मोठी किंमत मोजावी लागू शकते, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यावेळी सतीश काळे, गणेश दहिभाते, ज्ञानेश्वर लोभे, आदिनाथ मालपोटे, रशीद सय्यद, परमेश्वर जाधव, अभिषेक म्हसे, परशुराम रोडे उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: protest against bjp government's anti shiv act at thergaon