भोसरी : भोसरी गावचे ग्रामदेवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवातील आखाड्यात मानाच्या भैरवनाथ केसरी किताब महाराष्ट्र केसरी पहिलवान पृथ्वीराज मोहोळ तर भोजापूरचा किताब सिकंदर शेख यांनी जिंकला. वस्ताद केसरीचा मान शुभम शिंदनाळे यांना मिळाला..या वेळी आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक अजित गव्हाणे, अड. नितीन लांडगे, रवी लांडगे, पंडित गवळी, सागर गवळी, संतोष लोंढे, विश्वनाथ लांडे, बाळासाहेब गव्हाणे, जंगल फुगे, भानुदास फुगे, माजी नगरसेवक विजय फुगे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.भोसरी गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भोसरीतील गावजत्रा मैदानातील कै. सदाशिवराव रामभाऊ फुगे आखाडा मैदानात रोमहर्षक कुस्त्यांचा आखाडा पार पडला. या आखाड्यात लहानमोठ्या सुमारे अडीचशे पहिलवानांनी लाल माती अंगाला लावली. बुधवारी (ता. १६) सायंकाळी चार वाजता सुरू झालेल्या कुस्त्यांचा थरार रात्री दहा वाजता थांबला. कुस्ती शौकिनांनी शेवटपर्यंत प्रचंड गर्दी होती..भोसरीच्या नामांकित भैरवनाथ केसरीसाठी महाराष्ट्र केसरी पहिलवान पृथ्वीराज मोहोळ याने भारत केसरी विरेंद्र दहिया यांच्यामध्ये लढत झाली. रोमहर्षक लढतीत मोहेळ यांनी किताबावर नाव कोरले. महाराष्ट्र केसरी पहिलवान सिकंदर शेख आणि हिंद केसरी पहिलवान अभिषेक गुजर यांच्यामध्ये झालेल्या लढतीत सिकंदर शेखने गुजर यांस मातीत लोळवत हा किताब जिंकला. तर वस्ताद केसरीसाठी महाराष्ट्र केसरी ग्रीको पहिलवान शुभम सिंदनाळेने महाराष्ट्र केसरी पहिलवान दादा शेळकेवर मात करत हा किताब जिंकला. उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकरने महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीरवर मात करत मानाची गदा जिंकली. आल इंडिया चैंपियन आकाश माने आणि एशियन चैंपियन संजय तनपुरे यांच्यातील कुस्ती बरोबरीत झाली. महाराष्ट्र चैंपियन हनुमंत पुरी याने बाळू अपराधचा पराभव करत चांदीची गदा जिंकली..देवा थापाला कुस्ती शौकिनांची पसंतीसमाज माध्यमावर प्रसिद्ध असलेल्या पहिलवान देवा थापा याची पवन हरियाना यांच्याशी लढत झाली. थापाने केलेल्या चढाईला कुस्ती शौकिनांमधून शिट्ट्या, टाळ्या आणि ओरडून पसंती दिली जात होती.पहिलवानांबरोबर सेल्फीलहान मोठे कुस्ती शौकीन विजयी पहिलवानाबरोबरच आवडीने सेल्फी घेत होते. आखाडा मैदानावर महाराष्ट्र केसरी पहिलवान पृथ्वीराज मोहोळ यांनी विजय मिळविल्यानंतर नागरिकांनी आखाडा मैदानावर सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती.कुस्त्यांचा इतिहासाला उजाळाआखाड्यात निवेदक हंगेश्वर धायगुडे हे निवेदन करत असताना कुस्तींचा इतिहासही सांगत होते. त्यामुळे आखाडा मैदानातील प्रेक्षक निवेदनाकडे काळजीपूर्वक लक्ष देत होते. कुस्त्यांच्या रोमहर्षक किस्स्यांनी नागरिकांचे आकर्षणही वाढत होते. यावेळी शेखर लांडगे आणि विनायक माने यांनी सूत्रसंचालन करत कुस्ती शौकिनांना खिळवत ठेवले..पंचांची चोख कामगिरीआखाडा मैदनात आमदार महेश लांडगे, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, गणपत गव्हाणे, हिरामण लांडगे, किसन शिंदे, सागर लोढे, अनिल फुगे आदिंनी सरपंचाची भूमिका निस्वार्थीपणे निभावली. तर अमर फुगे, सम्राट फुगे, नितीन लांडगे, बाळासाहेब लांडे, अजय लांडगे, हर्षवर्धन माने, हरीष लोंढे, तन्मय गव्हाणे, दत्ता गव्हाणे आदिंनी आखाडा मैदानात पहिलवानांमध्ये संयोजनाची भूमिका पार पाडली.महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलचा सत्कारमहाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये नाथसाहेब केसरीसाठी लढत होणार होती. मात्र काही कारणास्तव पहिलवान गायकवाड आखाडा मैदानात येऊ शकले नाहीत. त्यामुळे ही कुस्ती होऊ न शकल्यामुळे ग्रामस्थांनी पहिलवान पाटील यांचा सत्कार केला.महाराष्ट्र केसरी पहिलवानांमुळे रंगतआखाडा मैदानात सहा महाराष्ट्र केसरी तर दोन उपमहाराष्ट्र केसरी पहिलवावानांनी हजेरी लावली. तर भारत केसरी, हिंदकेसरी, आल इंडिया चैंपियन, एशियन चैंपियन, महाराष्ट्र चॅचैंपियन आदी पहिलवानांची रोमहर्षक कुस्त्या पाहण्याचा आनंद मिळाल्याने कुस्ती शौकिनांनी आनंद व्यक्त केला. यावेळी १२ लाखाहून अधिक रोख रक्कमेची पारितोषिके पहिलवानांना देण्यात आली..महाराष्ट्र केसरी पहिलवानांमुळे रंगतआखाडा मैदानात सहा महाराष्ट्र केसरी तर दोन उपमहाराष्ट्र केसरी पहिलवावानांनी हजेरी लावली. तर भारत केसरी, हिंदकेसरी, आल इंडिया चैंपियन, एशियन चैंपियन, महाराष्ट्र चॅचैंपियन आदी पहिलवानांची रोमहर्षक कुस्त्या पाहण्याचा आनंद मिळाल्याने कुस्ती शौकिनांनी आनंद व्यक्त केला. यावेळी १२ लाखाहून अधिक रोख रक्कमेची पारितोषिके पहिलवानांना देण्यात आली.आणखी रोमहर्ष निकाली कुस्त्याआखाडा मैदानात ठरविलेल्या एकूण अठरा निकाली कुस्त्या झाल्या. यामध्ये उप महाराष्ट्र केसरी संदीप मोटे, महाराष्ट्र चैंपियन हनुमंत पुरी, विजयी, महेश कुंभार, अक्षय पवार, विजयी, सागर राऊत, योगेश तापकीर, महेश जाधव, युवराज पोपडे, निखील वाघ, स्वराज काळभोर, अजिंक्य सांडभोर, ओम नखाते, अभिषेक जाधव आदि पहिलवानांनी प्रतिस्पर्ध्यावर मात करत आखाडा मैदान गाजविले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.