
पिंपरी : पुनावळे येथील रस्त्याचे काम करताना महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड अर्थात ‘एमएलजीएल’ची वाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली. ही घटना पुनावळे येथील भुयारी मार्गालगत सकाळी आठच्या सुमारास घडली. गळतीनंतर दुरुस्तीसाठी भुयारी मार्गाजवळील एक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. परिणामी, कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ‘एमएनजीएल’ने दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानंतर तब्बल पाच ते सहा तासांनी गॅसचा पुरवठा सुरळीत करण्यात आला.