

Maan to Balewadi Pune Metro Line 3 First Phase Ready PMO Report Submitted When Will Metro Services Begin
sakal
पिंपरी: माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो लाइन ३ प्रकल्पातील माण ते बालेवाडी या १३ किलोमीटर अंतराच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेच्या अनुषंगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) तातडीचा अहवाल सादर केला. त्यामुळे प्रशासकीय सोपस्कार पूर्ण झाले असून उद्घाटनाची तारीख केव्हा जाहीर होणार, याची प्रतीक्षा आहे.