
भोसरी : वाढती अतिक्रमणे, रस्त्याऐवजी पदपथ रुंदीकरणाला प्राधान्य, बेशिस्त वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांचा अभाव, यामुळे पुणे-नाशिक महामार्गाच्या भोसरीतील सेवारस्त्यांवर नित्याचीच वाहतूक कोंडी होत आहे. एका चौकातील कोंडीचा परिणाम दुसऱ्या चौकांवर होत आहे. संध्याकाळच्या वेळेस हमखास वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. ही समस्या तातडीने दूर करण्याची मागणी वाहनचालक आणि नागरिकांमधून होत आहे.