

Pune Transport Issue: Why Was a PMPML Bus Left Running at Stop?
sakal
पिंपरी: डेक्कन जिमखाना स्थानकावर उभी असलेली पीएमपी बस माथेफिरूने पळवून नेल्यानंतर पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला, तरी यामुळे चालक आणि एकूणच पीएमपी प्रशासनाच्या निष्काळजीपणावरून संताप व्यक्त होत आहे. चालक बस कित्येक मिनिटे अकारण सुरू ठेवून सीएनजीची नासाडी करतात. त्यांची बेफिकिरी केव्हा थांबणार, याशिवाय एकूणच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पीएमपी प्रशासन केव्हा जागे होणार, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.