तळेगाव स्टेशन - शाळेची माजी विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलने आपण नेहमी पाहतो मात्र, निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांच्या स्नेहसंमेलनाचे उदाहरण तसे दुर्मिळच म्हणावे लागेल. कर्तव्य निभावताना आपल्याकरता जगायचे राहून गेलेले पोलीस अधिकारी जेव्हा निवृत्तीनंतर बऱ्याच वर्षांनी एकत्र भेटले तेव्हा जुन्या आठवणींना उजाळा देताना मिळालेला सुखद सहवास विलक्षण होता.