esakal | Pune : पुणे विद्यापीठात ‘स्मार्ट ट्रेनिंग’ सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : पुणे विद्यापीठात ‘स्मार्ट ट्रेनिंग’ सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शहरातील विद्यार्थ्यांना रोजगारक्षम अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व ‍पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यात स्किल डेव्हलपमेंट उपक्रम सुरू करण्यासंदर्भात सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्मार्ट ट्रेनिंग अँड इनोव्हेशन सेंटर (स्टीक) अभ्यासक्रम ऑगस्टपासून सुरू केला आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

स्टीक अभ्यासक्रमात ‘मायक्रोसॉफट क्लाऊड ॲडमिनिस्ट्रेशन’, ‘सॅप एबीएपी व एमएम फॉर अकाउंट्स’, ‘फायनान्स अँड बँक ऑफिस’ आणि ‘ऑटोकॅड इन डिझाइन इन ऑटोडेस्क’ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ऑनलाइन, ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. ‘सॅप करिअर एबीएपी’ व ‘सॅप करिअर एमएम’ अभ्यासक्रम दोनशे तासिकांचे असून प्रत्येकी ४० हजार रुपये शुल्क आहे. ‘ऑटोकॅड’ २०० तासिका व शुल्क १९ हजार ५०० रुपये आहे. ‘मायक्रोसॉफ्ट क्लाऊड ॲडमिन’ अभ्यासक्रमाच्या तासिका १८० सून शुल्क १३ हजार रुपये आहे.

लिनक्स ॲडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रम १८० तासिकांचा असून १९ हजार रुपये शुल्क आहे. अभ्यासक्रमाची अधिक माहिती www.sticonline.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

ऑनलाइन माध्यमातून रोजगार निर्मिती

पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रासाठी कार्यक्षम मनुष्यबळ निर्माण करणे, जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख व कौशल्यावर आधारित मॉड्यूल तयार करणे, हे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उद्देश आहे. आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन माध्यमातून रोजगार निर्मिती होत आहे. यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार असल्याचेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top