
Pune Floods
Sakal
पांडुरंग सरोदे
पुणे : शहरातील ओढे-नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह वळविल्याने, ते बंदिस्त केल्याने किंवा बंद केल्यामुळे सोसायट्या, घरे व मुख्य रस्ते पाण्याखाली जाण्याचा प्रकार दोन वर्षांपासून सुरू आहे. शहराच्या जुन्या हद्दीप्रमाणेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्येही असे प्रकार सर्वाधिक आहेत. संबंधित ठिकाणी बांधकाम परवानग्या देताना ओढे-नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहाकडे दुर्लक्ष केले आहे. दुसरीकडे सिंहगड रस्ता पूरस्थितीनंतरच्या पाहणी अहवालामध्ये नाल्यांच्या मुद्द्यावर प्रकाश टाकूनही महापालिका प्रशासन मात्र उदासीन राहिले आहे.