Open Bar : रहाटणीत ठिकठिकाणी रस्त्यावरच ‘ओपन बार’ सुरू; पोलिसांचे दुर्लक्ष, महिला व मुलांना प्रचंड त्रास

रहाटणीत ठिकठिकाणी रस्त्यावरच ‘ओपन बार’ सुरू असून, दारूच्या दुकानाशेजारचे हॉटेलही बिअरबार बनले आहेत. त्याचा महिला व मुलांना प्रचंड त्रास होत आहे.
Open Bar
Open Barsakal

रहाटणी - रहाटणीत ठिकठिकाणी रस्त्यावरच ‘ओपन बार’ सुरू असून, दारूच्या दुकानाशेजारचे हॉटेलही बिअरबार बनले आहेत. त्याचा महिला व मुलांना प्रचंड त्रास होत आहे. पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

रहाटणी फाट्यावरून तापकीर चौकाकडे येताना पेट्रोल पंपाच्या बाजूला व धनगर बाबा मंदिरासमोर मुख्य रस्त्यावरच ओपन बार सुरू आहे. जवळच दारूचे दुकान असल्याने तळीराम विविध वाहने, रिक्षात तसेच रस्त्यावर व खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर दारू पित असतात.

अनेकदा त्यांचा मुक्कामच तेथे असतो. त्यांच्यात अनेकदा वाद व शिवीगाळ होते. उघड्यावरच लघुशंका केली जाते. शालेय विद्यार्थी, महिला व लहान मुलांना त्याचा प्रचंड त्रास होतो. त्यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांना जीव मुठीत धरून जावे लागते.

रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने

पेट्रोल पंपाशेजारी व धनगरबाबा मंदिरासमोर असलेल्या दारूच्या दुकानात येणाऱ्यांची वाहने मुख्य रस्त्यावरच अस्ताव्यस्त लावलेली असतात. तसेच वाहनात बसूनच दारू पिली जाते. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडीही होते. येथे छोटेमोठे अपघात तर नित्याचेच झालेत. वाहतूक पोलिस मात्र, याकडे डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.

Open Bar
Kirtan Mahotsav : चिंचवडला उद्यापासून कीर्तन महोत्सव

पोलिसांकडून काणाडोळा

‘ओपन बार’मुळे विद्यार्थिनी व महिलांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली असून, परिसरातील नागरिकही पुरते हैराण झाले आहेत. मात्र, ओपन बारकडे पोलिस प्रशासन सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याचे जाणवत आहे. याबाबत अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पोलिसांना निवेदन देऊनही कोणतीच कारवाई झालेली नाही.

या ठिकाणाची पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचा आदेश पोलिस अधिकाऱ्यांना देणार आहे.

- गणेश जवादवाड, वरिष्ठ निरीक्षक, वाकड पोलिस ठाणे

श्रीनगरमधील पेट्रोल पंप ते तापकीर चौक दरम्यान असलेल्या देशी व विदेशी दारूच्या दुकानामुळे रस्त्यावरच ‘ओपन बार’ झाला आहे. त्याचा महिलांना त्रास होत असून, ही समस्या वर्षानुवर्षे तशीच आहे. पोलिस प्रशासनाने याचा कायमचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

- विकास एकशिंगे, सामाजिक कार्यकर्ते

पदपथावरच दारू पित असल्याने लहान मुले, महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकदा येथे वाद होतात. मद्यपी नागरिकांच्या अंगावरही गाड्या घालतात. याबाबत पोलिस प्रशासनाला निवेदन दिले आहे.

- अक्षय जगताप, सामाजिक कार्यकर्ते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com