
आरोपी संताजी याने भोईरवाडी येथील आनंदा भोईर यांच्या गाळ्यात आई गॅस एंटरप्रायजेस नावाचे दुकान सुरु केले. त्यात 19.3 किलो वजनाच्या मोठ्या टाक्यांमधून गॅस काढून चार किलो आणि साडेआठ किलो वजनाच्या लहान टाक्यात भरून त्याची चढ्या दराने विक्री केली.
सिलिंडरमधून धोकादायकरित्या गॅस काढून बेकायदा विक्री करणाऱ्या दुकानावर छापा
पिंपरी : धोकादायक पद्धतीने मोठ्या सिलिंडरमधूनछोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करून गॅसची विनापरवाना साठवणूक करणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मुळशी तालुक्यातील भोईरवाडी येथे करण्यात आली.संताजी तानाजी माने (वय 23, रा. भोईरवाडी, ता. मुळशी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आरोपी संताजी याने भोईरवाडी येथील आनंदा भोईर यांच्या गाळ्यात आई गॅस एंटरप्रायजेस नावाचे दुकान सुरु केले. त्यात 19.3 किलो वजनाच्या मोठ्या टाक्यांमधून गॅस काढून चार किलो आणि साडेआठ किलो वजनाच्या लहान टाक्यात भरून त्याची चढ्या दराने विक्री केली. तसेच दुकानामागे पत्राशेडमध्ये त्याने गॅसची विनापरवाना साठवणूक केली.
पुणे-औरंगाबाद एसटीवर झळकले संभाजीनगरचे फलक; मनसेचे कार्यकर्ते आक्रमक