Pimpri News : पुणे-लोणावळा मार्गावरील रेल्वे फाटके होणार बंद; सात ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याबाबतचा मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय

रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग वाढविणे, तसेच रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे-लोणावळा मार्गावरील सात रेल्वे फाटके बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.
Railway Gate

Railway Gate

sakal

Updated on

पिंपरी - रेल्वेगाड्यांचा सरासरी वेग वाढविणे, तसेच रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी पुणे-लोणावळा मार्गावरील सात रेल्वे फाटके बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. तेथे रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात येतील.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील हा मार्ग अतिशय व्यस्त आहे. या मार्गावर रोज सुमारे १५८ गाड्या धावतात. त्यामध्ये लोकल, एक्स्प्रेसबरोबरच वंदे भारत गाड्यांचाही समावेश आहे. त्यातून सुमारे दोन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा पुणे विभाग महत्त्वाचा विभाग आहे. मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईला जाणाऱ्या बहुतांश एक्स्प्रेस या मार्गावरून धावतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com