खंडाळ्यात महामार्गावर अपघात; रेल्वे पोलिसाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा येथील कोहिनूर महाविद्यालयाजवळ दुचाकी आणि टेंपोच्या धडकेत रेल्वे पोलिसाचा दुदैवी मृत्यू झाला.

लोणावळा : पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा येथील कोहिनूर महाविद्यालयाजवळ दुचाकी आणि टेंपोच्या धडकेत रेल्वे पोलिसाचा दुदैवी मृत्यू झाला. रमेश अशोक आगळे (वय ४१, रा. तळेगाव दाभाडे) असे मृत पोलिसाचे नाव आहे. शनिवारी (ता. ८) सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात झाला. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आगळे हे खोपोली येथे रेल्वे पोलिस दलात कार्यरत होते. शनिवारी सकाळी ते आपली ड्युटी संपवून मोटारसायकलने (क्र. एमएच. २२ एसी ९९७५) घरी परतत होते. त्यावेळी खंडाळ्यात कोहिनूर इन्स्टिट्युटसमोर वळणावर त्यांच्या दुचाकीस टेंपोने (एमएच १४, ईएम ०९६५) जोरदार धडक दिली. या धडकेत आगळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांनी उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway police death in accident at pune mumbai highway khandala