
पिंपरी : पावसाळ्यामुळे सर्वत्र पाणी साचणे व ओलसरपणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डेंगी व मलेरियासारख्या आजारांचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने डास निर्मूलन मोहिमेला गती दिली आहे. अंगणांत, छपरांवर, बांधकाम स्थळांवर, भंगाराची ठिकाणी, टाक्यांमध्ये पाणी साचून डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी कीटकनाशक फवारणी, घरे व कंटेनर तपासणी, भंगार दुकाने व बांधकाम स्थळांची पाहणी करून जनजागृती आणि दंडात्मक कारवाईवर भर दिला आहे.