pune rain
sakal
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहर, मावळ तालुक्यासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रविवारी (ता. ४) सायंकाळी सहाच्या सुमारास रिमझिम पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली.
पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला. त्यामुळे धुळीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा वेळ तरी दिलासा मिळाला.