राजेंद्र पाटलांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

राजेंद्र पाटलांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा पदभार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश पाटील यांनी आज (ता. 15) पदभार स्वीकारला. त्यांनी मावळते आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी हर्डीकर यांनी त्यांचे स्वागत केले.

हर्डीकर यांची राज्याच्या नोंदणी महानिरीक्षकपदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. तसेच, पाटील यापूर्वी ओडिशा प्रशासकीय सेवेत कार्यरत होते‌. शुक्रवारी दुपारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश राज्य सरकारने काढला. रविवारी ते शहरात दाखल झाले.

- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अतिरीक्त आयुक्तपदही रिक्त होते. त्याजागी विकास ढाकणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनीही पाटील यांच्यासोबत पदभार स्वीकारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com