पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 September 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा निर्णय; नगरसचिवांना दिले पत्र, औपचारिकता बाकी 

पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसने महापालिका विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक राजू मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. याबाबतचे पत्र सोमवारी (ता. 7) नगरसचिवांकडे देण्यात आले. आता केवळ विभागीय आयुक्तांच्या पत्रानंतर नाव घोषित करण्याची औपचारिकता उरली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपने 128 पैकी 77 जागा जिंकत प्रथमच सत्ता ताब्यात घेतली. राष्ट्रवादीला केवळ 36 जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना, अपक्ष व मनसे मिळून 15 नगरसेवक आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडे आले. सर्वांना संधी मिळावी, यासाठी दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलावा, असे पक्षाने ठरविले. त्यानुसार गेल्या साडेतीन वर्षात योगेश बहल, दत्ता साने व नाना काटे यांना संधी देण्यात आली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक क

आठ दिवसांपूर्वी काटे यांनी राजीनामा दिला होता. त्यापूर्वीच राष्ट्रवादीने इच्छुकांकडून अर्ज मागविले जाते. त्यानुसार मिसाळ यांच्यासह अजित गव्हाणे, डॉ. वैशाली घोडेकर, विनोद नढे व संतोष कोकणे यांनी अर्ज दाखल केले होते. शनिवारी (ता. 5) पक्षाची बैठक झाली. त्यात मिसाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊन सोमवारी नगरसचिवांकडे पत्र देण्यात आले. त्यांच्याकडून विभागीय आयुक्तांना कळविले जाईल. त्यांच्याकडे नोंदणी झाल्यानंतर अधिकृत पत्र येईल व अधिकृत घोषणा केली जाईल, असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले. 

राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 नगरसेवक निवडून आले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत कोरोनामुळे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने व जावेद शेख यांचे निधन झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ 34 वर आले आहे. भाजपची कोंडी करण्यासाठी व सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मिसाळ यांना आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. 

आगामी निवडणुकीचे गणित 
महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये आहे. त्याचा विचार करता साधारणतः अठरा महिने शिल्लक आहेत. हा पूर्ण काळ विरोधी पक्षनेते सांभाळण्याची संधी मिसाळ यांना मिळते की, त्यांच्या नंतर आणखी कुणाला संधी मिळेल, यावरच निवडणुकीची खेळी अवलंबून राहील. 

स्मार्ट सिटीचे संचालक 
निगडी-प्राधिकरण प्रभागाचे नेतृत्व राजू मिसाळ करीत आहेत. तिसऱ्यांदा ते नगरसेवक झाले आहेत. त्यांनी उपमहापौर, क्रीडा समिती सभापती, प्रभाग समिती अध्यक्षपद भूषविले आहे. स्थायी समितीचे दोन वर्षे सदस्य होते. आता "स्मार्ट सिटी'चे संचालकही होतील. कारण, विरोधी पक्षनेता हा "स्मार्ट सिटी'चा पदसिद्ध संचालक असतो. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raju Misal will be Leader of Opposition in Pimpri Chinchwad Municipal Corporation