पिंपरी-चिंचवडकरांसाठी जून ठरतोय सगळ्यात धोकादायक; रुग्णवाढ अन् मृत्यूदर पाहाच

पिंपरी-चिंचवडकरांसाठी जून ठरतोय सगळ्यात धोकादायक; रुग्णवाढ अन् मृत्यूदर पाहाच

पिंपरी : शहरात कोरोनाचा विळखा वाढतो आहे. जून महिन्यात रुग्णवाढीचा वेग व मृत्यूदरही सर्वाधिक राहिला असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. विशेषतः दाट लोकवस्तीच्या भागात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. 

कोरोनाचा पहिला रुग्ण 11 मार्च रोजी शहरात आढळला. तेव्हापासून आजपर्यंत रुग्णसंख्या वाढतच आहे. गुरुवारी दुपारी चार वाजेपर्यंत एकूण रुग्णसंख्या दोन हजार 260 झाली होती. रुग्ण आढळलेला भाग कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करूनही संख्या वाढते आहे. सुरुवातीला सोसायट्यांत झालेला संसर्ग आता झोपडपट्ट्या, चाळी व दाट लोकवस्तीत शिरला आहे. 

आकडे बोलतात 

11 मार्च ते 31 मे या 82 दिवसात 566 रुग्ण आढळले होते. एकूण रुग्णवाढीत हा दर 25 टक्के राहिला आहे. तर या कालावधीत अवघ्या आठ जणांचा मृत्यू झाला होता. एकूण रुग्णांत हे प्रमाण 20 होते. मात्र, एक जून ते 25 जून या 25 दिवसांत 1694 रुग्ण वाढले. एकूण रुग्णवाढीचा वेग 75 टक्के असल्याचे दिसते. या कालावधीत 31 जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये हे प्रमाण 80 टक्के आहे. 

गुरुवारी दुपारी चारपर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण दोन हजार 260 होते. पैकी बरे झालेली रुग्णसंख्या एक हजार 325 झाली आहे. सध्या 896 जण उपचार घेत आहेत. एकूण 39 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी चारपर्यंत नवीन 75 रुग्ण आढळले आहेत. तर 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दोन जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांमध्ये एक हजार 275 पुरुष आणि 924 महिला आहेत. 

आजपर्यंत क्वारंटाइन केलेल्यांची संख्या 23 हजार 62 आहे. त्यापैकी रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये क्वारंटाइन केलेल्यांची संख्या चार हजार दोन आहे. तर घरीच चौदा दिवस क्वारंटाइन केलेल्यांची संख्या चार हजार 620 आहे. आजपर्यंत 28 दिवस सर्वेलियन पूर्ण झालेले म्हणजे क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या 14 हजार 428 आहे. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वयोगटानुसार रुग्णांचा विचार केल्यास गुरुवारी दुपारी चारपर्यंत शून्य ते 12 वयोगटातील मुलांची संख्या 240 आहे. 13 ते 21 वयोगटातील किशोर व युवकांची संख्या 286 आहे. 22 ते 39 वयोगटातील 889 तरुणांना संसर्ग झालेला आहे. 40 ते 59 वयोगटातील प्रौढांची संख्या 586 आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची संक्‍या 251 आहे. 

आज रुग्णालयात 896 जण उपचार घेत आहेत. त्यात सौम्य लक्षणे असलेले 769 रुग्ण आहेत. तीव्र लक्षणे असलेली 91 रूग्ण आहेत. तर 36 जण गंभीर आहेत. त्यातील काही व्यक्तींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराबाहेरील रहिवासी असलेले मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिका व शहरातील खासगी रुग्णालयात आजपर्यंत 234 जणांनी उपचार घेतले आहेत. त्यातील 141 जण बरे होऊन घरी गेलेले आहेत. सध्या 67 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 26 जणांचा मृत्यू झालेला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com